shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदित्यराज इंगळेची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

                                       
प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी                                   
  
 केज शहरातील आतूल इंगळे यांचे जेष्ठ चिरंजीव व काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव घाट शाळेचा विद्यार्थी आदित्यराज इंगळे याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 71 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तो जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत केज तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. आज दि.23/08/2024 रोज शुक्रवारी होळ येथे पार पडलेल्या तालुका स्तरिय कुस्ती स्पर्धेत आदित्यराज इंगळे याने आपल्या कौशल्यपूर्ण व विविध डावातून समोरच्या पैलवानांना चितपट करून प्रथम क्रमांक पटकावला.        

या साठी त्यांना स्वामी विवेकानंद शाळेचे क्रीडा शिक्षक व तालुका समन्वयक विनोद गुंड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आदित्यराज इंगळे यांच्या यशाबद्दल त्यांचे आजोबा संपतराव इंगळे, जिवन विकास क्षिशण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे, वडील आदित्यराज इंगळे,आई अलका ताई इंगळे, प्रा.राहुल गदळे, विनोद गुंड सर, पञकार प्रकाश मुंडे यांच्यासह शाळेच्या शिक्षकांनी अभिनंदन करुन जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्यराज इंगळेच्या या यशाबद्दल केज शहर व तालुक्यातून शुभेच्छ्यांचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे .                

आदित्यराज इंगळे यांचे वडील आतूल इंगळे हे मुंदडा घराण्याचे कट्टर समर्थक असून त्यांच्या मुलाच्या यशाबद्दल केज मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षय भैय्या मुंदडा यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
close