shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत प्रथमच कलाकार भव्य मेळावा


*हिंदी/ मराठी सिने व मालिका क्षेत्रात करिअर ची इच्छा असणाऱ्या मान्यवरांना उपस्थित राहण्याचे संसारे यांचे आवाहन

वजीर शेख / पाथर्डी 
जगदगुरु श्री साईंबाबाजींची पावन भुमि असलेल्या शिर्डीत प्रथमच सिने क्षेत्रातील कलाकारांचा भव्य मेळावा बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता, हाॅटेल साई सुमन [शिर्डीतील पाचशे रुम.भक्त निवास च्या पाडीमागे) होत आहे.तरी सर्व सिने क्षेत्रातील आर्टिस्ट, लेखक,दिग्दर्शक,निर्माता,मेकअप मन, कॅमेरामन, बालकलाकार,संगीतकार, डान्सर,तसेच टेक्निकल टिम. यांनी हेच निमंत्रण समजुन या कलाकार मेळाव्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सुदाम संसारे यांनी केले आहे.

या मेळाव्यात नामवंत निर्माता व दिग्दर्शक. आणि लेखक हे नविन आगामी येणाऱ्या नवीन मराठी व हिंदी चित्रपट व सिरीयल साठी आलेल्या आर्टिस्ट मधुनच निवड करण्यात येणार आहे.जे आर्टिस्ट या मेळाव्यास हजर राहातील त्यांचीच निवड नवीन चित्रपट व सिरीयल साठी करण्यात येणार आहे.घरी बसुन किंवा फोन करुन सांगणाऱ्या आर्टिस्ट ची निवड केली जाणार नाही,तरी ज्या आर्टिस्ट ला चित्रपटात किंवा सिरीयल मध्ये काम करायचे असेल त्यांनी या मेळाव्यास प्रत्यक्ष हजर राहाणे गरजेचे आहे.परत आसा मोठा कलाकार मेळावा घेतला जाणार नाही.येथे आल्यावर तुम्हाला समजेल की, कोणाची कोणत्या चित्रपटा साठी निवड करण्यात आली आहे, तरी सर्व आर्टिस्ट यांनी आपली निवड व्हावी याच हेतुने तयारी करुन यावे,या भव्य कलाकार मेळाव्या साठी विशेष प्रयत्न करणारे मेळाव्याचे आयोजक सुदाम संसारे,राजु बनेमियाॅ मुलाणी बेलापुरकर, डाॅ.अजय वारुळे, सौ.वंदना गव्हाणे, सुनंदा सुर्यवंशी,अर्चना परदेशी,राजेश काळे, सलिम सौदागर,संजय ढाकरके, समाधान बिथरे,संभाजीराव खैरे,बनसोडे मामा,मधुकर बनसोडे,प्रिया उशिरे,वजीर शेख,पत्रकार तथा दिग्दर्शक पांडुरंग गोरे,कवी सरकार इंगळी,श्री.वानखेडे,तसेच टिम मधील सर्व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close