*एल.जी.बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज पळसदेव हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश*
इंदापूर: पुणे जिल्हा शालेय हॉलीबॉल स्पर्धा सन 2024-25 तालुका स्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा 14वर्ष व 17वर्ष वयोगटात मुले, या स्पर्धा 23ऑगस्ट कालावधी मध्ये म्हसोबावाडी येथे पार पडल्या यामध्ये एल.जी. बनसुडे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील 14 वर्ष मुले यांनी हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय निवड झाली तसेच 17 वर्ष मुले हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व खेळाडुचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव व प्रकाश वायकर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ.हनुमंत नाना बनसुडे ,उपाध्यक्ष डॉ शितल कुमार शहा ,कार्याध्यक्ष सौ.नंदाताई (नानी) बनसुडे ,प्राचार्य सौ.वंदना बनसुडे संस्थेचे विश्वस्त,सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.यावेळी सचिव नितीन बनसुडे, मुख्याध्यापक श्री राहुल वायसे, डॉ. शिवाजी मोरे , म्हसोबावाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोंग सर ,प्रा सागर मोरे सर , रणजित बनसुडे , आदी उपस्थित होते.

