हरिगाव मतमाउली यात्रापूर्व आठवा शनिवार नोव्हेना संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगाव येथील
मतमाऊली चर्चमध्ये आठव्या मतमाउली यात्रापूर्व शनिवारी नोव्हेना भक्ती संपन्न झाले.
याप्रसंगी रे.फा.ज्यो गायकवाड यांनी प्रतिपादन केले की आजचा विषय आहे” पवित्र मरिया पावित्र्याचा आदर्श”आज आठवा शनिवार नोव्हेना साजरा होत आहे.
आज आपण धन्य कुमारी मारिया, आरोग्यदायी माता या विषयी मनन चिंतन करीत आहोत. पवित्र मरीयेने अनेक शतकापासून विविध ठिकाणी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये दर्शने दिली आहेत. ती तीर्थस्थाने प्रसिद्ध आहेत.फ्रांस या देशामध्ये लुड्स या गावी हजारो भाविक हजारो रोगी या मातेकडे आरोग्यदानाकडे जातात.व अनेकांना तेथे आरोग्यदान प्राप्त झाले आहे.जसे फ्रान्समध्ये लुड्स हे तीर्थस्थान प्रसिद्ध आहे तसे आपले भारत देशामध्ये वेलंकिनी माता,वान्द्रेची माता, व हरिगावची मतमाउली सुद्धा आरोग्यदानासाठी प्रसिद्ध आर सी तीर्थस्थान आहे.पवित्र मारीयेची मध्यस्थी ही फार प्रभावी आहे.जे तिच्याकडे विश्वासाने भक्तीने आपल्या विनंत्या घेऊन जातात त्यांच्या विनंत्या मागण्या ती मोठ्या दयेने आपुलकीने मान्य करीत असते.व प्रसन्न होऊन त्यांना ती आपले कृपादान देत असते.आरोग्य हे सर्वात महत्वाचे आहे.आरोग्य हे शरीराचे आहे.मनाचे आहे,आत्म्याचे आहे.जेंव्हा आपले आत्मिक आरोग्य सांभाळतो आपले नैतिक जीवन शुद्ध स्वच्छ निर्मळ ठेवतो.तेंव्हा आपले मन प्रसन्न असते.व प्रसन्न मनामध्ये माणूस शांती अनुभवीत असतो.प्रसन्नता अनुभवीत असतो.संतानी म्हटले आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण,मन स्वच्छ निर्मळ असेल तर शुद्ध असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो व आपल्याला कोणत्याही शारीरिक व्याधी लागत नाही.वेगवेगळ्या आजारापासून आपण मुक्त होतो.सुरक्षित राहतो.अशा रीतीने हे आरोग्य शरीर आत्मा आणि मन या सर्वाना जोडणारे आहे.या सर्व घटकामध्ये जेंव्हा माणूस नैतिक जीवन जगतो तेंव्हा त्याला मनशांती मिळते.मनशांती मिळाले म्हणजे त्याचे शरीर हे निरोगी राहते.आरोग्यसंपन्न राहते,आज आपण धन्य कुमारी मारिया तिचा सोहळा साजरा करीत आहोत.पवित्र मारिया ही आरोग्याची आदर्श माता आहे.ती आदर्श जीवन जगली.निरोगी जीवन जगली,निष्कलंक जीवन जगली.या मातेने आपणा सर्वाना आरोग्याचे दान द्यावे, आपल्या शारीरिक व्याधी दूर व्हाव्यात, आपली मने शांत प्रसन्न व्हावीत व आत्मिक शांती,आत्मिक बळ तिने आपल्याला पुरवावे, म्हणून आज तिच्या चरणी विशेष प्रार्थना करू या.या नोव्हेनात संत मेरी चर्च संगमनेर,संत इग्नाथी चर्च घुलेवाडी,संत झेवियर चर्च मनमाड येथील धर्मगुरू फा.सहायराज, फा.नेल्सन परेरा,फा. शहाराव,फा जयसिंग, हरिगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ,फा फ्रान्सिस ओहोळ,फा.संतान रॉड्रीग्ज,व सर्व धर्मभगिनी सहभागी होत्या.वडाळा महादेव ग्रामस्थांनी सर्व धर्मगुरूचा सन्मान केला
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगाव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

