श्रीरामपूर / प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्ट सरकारच्या निष्क्रियतेमुळे आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेलाच कलंक लावल्याने या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ व श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक २/०९/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता श्रीरामपूर नगर परिषदेसमोर सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली. महायुती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले.
या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ 'सरकार विरोधात जोडे मारो' आंदोलन करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ससाणे यांनी केले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

