shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये बोराटवाडी विद्यालयाचे नेत्रदिपक यश

तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये बोराटवाडी विद्यालयाचे नेत्रदिपक यश

 इंदापूर:  म्हसोबावाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय  हॉलीबॉल स्पर्धेमध्ये लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मधील मुलींच्या हॉलीबॉल संघाने नेत्रदीपक यश संपादन केले. 
       19 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुका स्तरावरती विजेता ठरला आहे.विजेता संघ जिल्हा  जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
       तर १७ वर्षे वयोगटांमध्ये मुलींच्या हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक (उपविजेता) संपादन केला .
        १४ वर्षे वयोगटामध्ये मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. 
          विजेच्या संघाचं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष  हर्षवर्धन पाटील,निरा भीमाचे संचालक उदयसिंह पाटील,युवा नेते राजवर्धन  पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव  किरण पाटील , प्राचार्य  भीमराव आवारे ग्रामस्थ व पालक यांनी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.
     या विद्यार्थ्यास क्रीडा शिक्षक  सदाशिव सावंत व  चंद्रशेखर काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
close