प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक असल्यामुळे अधिकारी वर्ग टक्केवारीच्या नादात काय करतो आहे हे त्यांना पण कळेना झाले आहे. कोट्यवधी रुपयांची कामे पंचायत समिती अंतर्गत चालू आहेत. त्यामध्ये प्रत्येक हेड ला टक्केवारी ठरलेली आहे .त्या नादात अधिकारी व कर्मचारी यांना अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांची सुद्धा पैसे उचलणे सुरू आहे . त्याचं उदाहरण म्हणजे बोरगाव येथील रस्त्याचे काम .बोरगाव ते दैठणा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू आहे व त्याच रस्त्याचे मस्टर पण MREGS मधून चालू आहेत.
या विषयात श्री विकास शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखल केलेली असताना सुद्धा सदरील रस्त्याचे मस्टर पेमेंट मजुरांच्या नावे काढण्याचे काम गटविकास अधिकारी यांनी केले आहे. तसेच तालुक्यात चालू आसलेल्या 90/10 ,85/15 ,25/15 व MREGS ची अनेक कामे निकृष्ट दर्जाची झालेली असताना त्यांना देयके देण्यात आलेली आहेत . काही रस्त्यावर तर काम न करताच बिले उचलण्यात आलेले आहेत .
तसेच MREGS अंतर्गत चालू असलेल्या विहिरीचे पण बोगस बिले देण्यात आलेली आहेत .या संदर्भात लवकरच प्रत्येक गाव निहाय कामांची मालिका माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल .तसेच बोरगाव ते दैठणा हा रस्ता pmjsy प्रधानमंत्री ग्राम सडक योजना एक बडा राजकीय नेता करत असून तोच रस्ता MREGS मधून करणारा पण त्याच नेत्याचा बगलबच्चा आहे. त्यांची पण नावे लवकरच जाहीर केली जातील .त्यांच्या दबावाखाली सध्या पंचायत समितीचे कर्मचारी व गटविकास अधिकारी काम करत आहेत .याचा लवकरच पर्दाफाश केला जाईल . लवकरच केज पंचायत समितीच्या बोगस कामकाजाची मालिका पहा.