shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२१ डिसेंबर रोजी कोपरगावात रंगणार अंडर १६ मुले पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धा


पुणे,नाशिक,नगर जिल्ह्यातून
१२ संघ होणार सहभागी

कोपरगाव / प्रतिनिधी:
येथील सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने एक दिवसीय १६ वर्षाखालील मुलांच्या पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेचा आयोजन शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी कोपरगावात करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी पुणे,नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातून १२ संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु. ५०००/- व चषक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु ३०००/- व चषक, तृतीय क्रमांकासाठी रु २०००/- व चषक तर चतुर्थ क्रमांक संघासाठी रू १०००/- व चषक पारितोषिक विजेत्या संघाला प्रधान करण्यात येईल. स्पर्धेच्या दिवशी ठीक  ९:३० वा सामन्यांना सुरुवात होईल, स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धेच्या दिवशी दु. ५:०० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती शाळेचे प्राचार्य श्री. के.एल. वाकचौरे यांनी दिली.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 

संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close