श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद एस. शेख संपादित वृत्तनगरी या वर्तमानपत्रात गत वर्षभरापासून विविध विषयांकित समाजाभिमुख लेख, बातम्यांना वृतनगरी या वर्तमानपत्र अंकाद्वारे सातत्याने प्रसिद्धी दिली जात आहे, वर्तमानपत्राची नियमित सातत्य टिकवत सदरील अंकात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांसह जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न आणि समस्यांना उजाळा दिला जात आहे, यामध्ये संपादक जावेद एस.शेख यांचे मोठे परिश्रम असल्याने नुकताच वृतनगरी या वर्तमानपत्रास पीआरजीआय रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाल्याने त्यांचा परिश्रमास यश प्राप्त झाले आहे
भारत सरकार प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI) (पुर्वी ज्यास आरएनआय असे म्हटले जायचे) या कार्यालयाकडून वृतनगरी या वर्तमानपत्रास पीआरजीआय रजिस्ट्रेशन क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या हस्ते समता कार्यालयात संपादक जावेद शेख यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शौकतभाई शेख यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडून त्यांच्या भावी उज्वल कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख म्हणाले की, वर्तमानपत्र चालवणे ही तारेवरची कसरत आहे हे नाकारुन चालणार नाही,आजच्या सोशल माध्यमांच्या युगात वृतनगरी या वर्तमानपत्राने प्रिंट मिडिया क्षेत्रात आपले सातत्य टिकवून धरले असल्याने त्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे, यापुढे देखील असेच सातत्य टिकवत पुढील वाटचाल करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी ॲड.मोहसिन शौकत शेख, तहसीन पांडे, वृक्ष संवर्धन चे संपादक शब्बीर उस्मान शेख,राज प्रसारित चे संपादक राजु मिर्झा, सामाजिक कार्यकर्ते भगवंतसिंग बत्रा आदि मान्यवर उपस्थित होते.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

