shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत राष्ट्रीय पातळीवर भव्य - दिव्य "साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार" वितरण सोहळ्याचे ३ मे रोजी आयोजन

या पुरस्कारात भाग घेवू इच्छिणाऱ्या मान्यवरांना संपर्क करण्याचे आवाहन
शिर्डी / प्रतिनिधी:
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.
फिल्म प्रॉडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईंच्या शिर्डी या पवित्र पावनभुमित शनिवार दि.३ मे २०२५ रोजी सकाळी १०. ००.वाजता हाॅटेल शांतीकमल याठिकाणी सदरील मान - सन्मानाचा आणी प्रतिष्ठेचा असा हा भव्य - दिव्य तथा आगळा वेगळा शानदार,दमदार व दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा सिने सृष्टीतील नामांकित व नामवंत सेलिब्रिटीज अभिनेत्री मानसी नाईक. तसेच सुप्रसिद्ध उद्योजक किशोरशेठ कालडा व इतर प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत तथा हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.


या पुरस्कार सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे,उपाध्यक्षा वंदना गव्हाणे, सल्लागार डाॅ.अजय वारुळे,कार्याध्यक्ष राजेश काळे, स्वागताध्यक्ष. राजनंदीनी आहिरे,अर्चना परदेशी, सौ.किरण वाघ, तसेच सरचिटणीस संभाजीराव खैरे, सहसरचिटणीस समाधान बिथरे, सदस्य प्रिया डाखोडे, प्रतिभा प्रमोद,निशा गावंडे, शितल राऊत,कांचन शिरभे, तारा डाके,जयश्री गावित, प्रिया उशिरे,प्रियंका मयेकर, राधा सावरकर,अंजली महाले,आरती बारवसे, श्रीमेस्वाल मॅडम,जयश्री बिरलिंगे,प्रमिला डोंगरे, सुवर्णा रंगारी/डहाट, संजय ढाकरके,राजेंद्र पोळ,माधव चोपडे,सुरज जाधव,अरुण गरुड,शंकर कन्हेरकर,राम दुधभाते, श्री.वेदपाठक, शाम जाधव, भुषण सरदार, प्रसिध्दी प्रमुख वजीर शेख, दतात्रय आठरे,पांडुरंग गोरे,दिलीप वनवे,सारंग महाजन सर्व पुरस्कार सोहळा समितीतील सदस्य हे या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

या पुरस्कारात भाग घेवू इच्छिणाऱ्या मान्यवरांना संपर्क करण्याचे आवाहन

श्री साईंच्या पवित्र पावन भूमित साईंच्या नावाने दिला जाणारा भारत देशातील पहिल्याच पुरस्कार असल्याने विविध (३६) क्षेत्रातील कार्य असलेल्या तथा यामध्ये भाग घेवू इच्छिणाऱ्या मान्यवरांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत 9688467506 या  मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संस्थापक अध्यक्ष  सुदाम संसारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

वृत्त विशेष सहयोग
पत्रकार वजीर शेख - पाथर्डी 
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close