अनुज बनसोडे याचे हॉली
बॉल स्पर्धेतील सुयश !
राहाता / प्रतिनिधी:
राहाता तालुक्यातील साकुरी येथील अनुज ज्ञानेश्वर बनसोडे याने एम.आय.टी. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आळंदी पुणे या महाविद्यालया मार्फत वार्षिक स्नेह संमेलन आयोजित भव्य अशी हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पुणे सारख्या शिक्षणाचे माहेर घर असलेल्या अत्यंत चुरशीच्या व अटी तटीच्या या लढतीमध्ये अनुज ज्ञानेश्वर बनसोडे या बहाद्दर विद्यार्थ्याने सदर खेळाचे कॅप्टन पद मिळवून हा अटीतटीचा सामना जिंकण्यासाठी बहुमोल कामगिरी बजावली आहे. अनुज बनसोडे याचे या खेळातील अती चाणाक्ष खिलाडी वृत्तीने व हूनर बाजीने प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारी ही त्याची आतिशबाजी शेवटी या चुरशीच्या लढतीत विजयाचा महामेरू ठरली. अनुज ज्ञानेश्वर बनसोडे हा राहाता तालुक्यांतील साकुरी सारख्या ग्रामीण भागातील असून तो एम.आय.टी. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आळंदी पुणे या महाविद्यालयात बी.एस. सी.अनिमेशन या वर्गात प्रथम वर्षा करिता प्रवेशित आहे.त्याच्या या हॉलीबॉल स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीने त्याने सदर महाविद्यालयाचे व आपल्या साकुरी गावाचे नाव उंचावले आहे.अनुज ज्ञानेश्वर बनसोडे हा विद्याथी रयत शिक्षण संस्थेतील माजी प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांचा चिरंजीव आहे. या पूर्वीही अनुज बनसोडे याने विविध क्रिडा स्पर्धा मध्ये विशेष प्राविण्य संपादन केले असून नाव लौकिक मिळवला आहे.त्याच्या या यश्याबद्दल एम.आय.टी महाविद्यालय पुणे आळंदी व राहाता तालुका परिसरातून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होऊन भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

