कुणा कुणाला ईथे तुपात भिजलेली साखर पाहीजे!
मला माझ्या बापाच्या घामात भिजलेली भाकर पाहीजे!
टाळ्या, मनोरंजन पुरस्कारासाठी मी लिहीत नाही काही!
मला प्रत्येकाच्या काळजात एक जागा चिकार पाहीजे!
शेर, गजल आईकणारा यार दिलदार मस्तीखोर असावा!
सोबतीला जिंदगीत उद्ववस्त झालेले मिञ टुकार पाहीजे!
मी मिळकत नाही , ना ऐवज , ना बेवारससी मालमत्ता!
तुझ्या नकारावरही माझा राखुन ठेवलेला होकार पाहीजे!
फायद्याची शेती करणारा नको मातीवर खुप जिव असावा
खोट्यांचा धिक्कार करणारा खर्याचा आता सत्कार पाहीजे!
फळ्यावर सुविचार लिहुन कुठे बदल घडलाय दाखवा!
जगण्यात वागण्यात संत महापुरुषांचा विचार पाहीजे!
ऊद्याचं ऊद्यावर सोडुन भेटेल त्या क्षणांचा उत्सव कर!
हक्क, अधिकार देणार्या संविधानाचा प्रचार पाहीजे!
नसेलही फुटकी कवडी, असेल फाटकी गळकी झोपडी!
येडा बनुन पेढा खाणारा प्रत्येक जन ईथे हुशार पाहीजे!
केंव्हांही येवुदे काहीही होवुदे आपण माञ तयार पाहीजे!
सरनावर हसत हसत नेणारे हक्काचे खांदेकरी चार पाहीजे!
आकाश सुपारे...

