shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथे स्वाभिमान प्रतिष्ठान व न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी..

वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) : पारंपरिक वेशभूषेत नटलेले विद्यार्थी विद्यार्थिनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष अग्रभागी घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शिवजयंती साजरी करण्यात आली ढोल ताशे आणि छत्रपती शिवाजी महाराज घोषणांनी भारावलेले वातावरण,सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले स्वाभिमानी प्रतिष्ठानचे मावळे व न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव चे विद्यार्थी विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर,प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.

      यावेळी स्वाभिमानी प्रतिष्ठान कासारमळा गुंडेगाव यांच्या वतीने ऐतिहासिक शिवनेरी किल्ला येथून पायी ज्योत आणण्यात आली. या ज्योतीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत करण्यात आले.भव्य भगवा ध्वज फडकवण्यात आला.तसेच यावेळी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करत शिक्षक,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी पोवाडा गायन, लेझीम नृत्य, फुगडी असे विविध कार्यक्रम सादर केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज याचे कार्याबद्दल मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना ते त्यांची एकूण कार्यपद्धती अशी महाराजांची विविध कौशल्ये मांडली. शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले.स्वाभिमान प्रतिष्ठान,शाळा, कॉलेज,आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे गावातील चौकात जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते.
       यावेळी शिवजयंतीनिमित्त स्वाभिमान प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थी विद्यार्थिनी,ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close