इंदापूर: पळसदेव :-(ता.इंदापूर)येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यालयातील परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि आकर्षक सजावटीने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अमृततुल्य मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले दादा मुलाणी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.
शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वकृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्व विठ्ठल बाबुराव पोटे यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात आले .यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे
निबंध स्पर्धा-
गट पहिला- इयत्ता पहिली ते तिसरी-
प्रथम-भैरवी लावंड
द्वितीय-आद्या जगताप
तृतीय- प्रिया कोल्हे
गट दुसरा-चौथी ते पाचवी-
प्रथम- शिवन्या जगताप
द्वितीय-गार्गी शेलार
तृतीय- अक्षरा खारतोडे
गट तिसरा-इयत्ता सहावी ते आठवी
प्रथम -ऋतुजा बांडे
द्वितीय-अर्णव बनसुडे
तृतीय-सृष्टी बनसुडे
*वकृत्व स्पर्धेतील विजेते* -
गट-पहिला-इयत्ता पहिली ते पाचवी
प्रथम-भैरवी लावंड
द्वितीय-अलीना सय्यद
तृतीय-सई गोळे
उत्तेजनार्थ-शिवांजली बनसुडे
गट दुसरा -इयत्ता सहावी ते आठवी
प्रथम-साक्षी काळे
द्वितीय-तेजस्विनी लहाने
तृतीय-श्रेया भोसले
गट चौथा -इयत्ता नववी ते अकरावी मधील निबंध वकृत्व स्पर्धेचे विजेते
प्रथम-स्वराली शेलार
द्वितीय-सानिका मराठी
तृतीय-श्रावणी पिसाळ
सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. इयत्ता तिसरीतली कीर्ती जगताप व पाचवीतील अपर्णा गायकवाड या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. तसेच प्री प्रायमरी विभागातील सीनियर केजी ची विद्यार्थिनी अंशिका सूर्यवंशी हिने सादर केलेला महाराजांचा पाळणा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.
संस्थेच्या प्राचार्या वंदना बनसुडे व मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रपट सादर करून शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य व नेतृत्व गुणांची माहिती दिली. सहशिक्षक सुनील बांडे यांनी विद्यार्थी व पालकांना शिवाजी महाराजांच्या आदर्श आचरण पालन करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमासाठी सचिव नितीन बनसुडे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, सीमा बाराते, तेजस्विनी तनपुरे, तनुजा फुगे, शिक्षकवृंद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पोटे व आभार प्रदर्शन प्रवीण मदने यांनी केले. सांस्कृतिक विभागातील शिक्षक अर्चना बोंद्रे, शितल झणझणे व सर्व वर्गशिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सर्व पालक वर्गातून मनापासून कौतुक करण्यात आले.

