shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी धडकदार निवड!



राज्याच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर

नगर प्रतिनिधी: 
महाराष्ट्रातील राजकारणात एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडली असून, भाजपने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश पक्षाने दिला आहे. यात विशेष बाब म्हणजे, नगर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची ठरावी अशी निवड करत, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या खांद्यावर थेट 'प्रदेश उपाध्यक्षपदाची' मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. या घोषणेत डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह इतर दहा जणांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची आणि पक्षविस्तारासाठी घेतलेल्या मेहनतीची थेट दखल पक्षश्रेष्ठींनी या निवडीमधून घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नगर जिल्ह्यातून थेट राज्य संघटनेत एवढ्या उच्च पदावर वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि विखे समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. स्वतः डॉ. विखे पाटील यांनीही या जबाबदारीला एक मोठी संधी मानत, राज्यभर पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

२०२९ च्या निवडणुकांवर लक्ष:
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या नव्या कार्यकारिणीला मान्यता देताना थेट २०२९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. संघटनात्मक बळकटी, नव्या नेतृत्वाला वाव आणि विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोच वाढवणे या उद्दिष्टांवर विशेष भर देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांना दिलेली ही संधी आगामी राजकीय रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे.

प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख नियुक्त्या:
डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह गोपीचंद पडळकर, चेतन देशमुख, अतुल भातखळकर, भारती पवार, संजय केळकर, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे आणि अर्चना चाकूरकर यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच सरचिटणीस पदावर निरंजन डावखरे, योगेश क्षीरसागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ यांची निवड झाली आहे.
कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा, तर सहकोषाध्यक्ष म्हणून लखानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ पडळकर, युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक तर महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून चित्रा वाघ यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राजकीय समीकरणांमध्ये नवा अध्याय:
या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या राज्य संघटनेत ताजेपणा आणि नवे नेतृत्व समोर आले आहे. जिल्हा ते राज्य असा प्रवास करत नेतृत्वाला मिळालेली संधी ही तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक शिस्त, विस्तार आणि प्रभावी जनसंपर्क यावर भर देत पक्ष पुढील वाटचाल करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

डॉ. सुजयदादांच्या निवडीने जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळेल! – पत्रकार तुषार महाजन

"माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली निवड ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे. डॉ. सुजयदादांचे अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व, तसेच युवकांमधील त्यांची लोकप्रियता पाहता, त्यांना राज्य पातळीवर मिळालेले हे मोठे व्यासपीठ जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच नवी दिशा देईल. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर याचा मोठा आणि सकारात्मक प्रभाव पडेल.
-तुषार संजय महाजन
(जिल्हाध्यक्ष - राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, अहिल्यानगर)
close