shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी महाराजांची प्रतिमा महामंडळ कार्यालयात लावण्यासाठी सप्रेम भेट

मुंबई प्रतिनिधी | दि. २३ फेब्रुवारी २०२६

महाराष्ट्र शासनाने लोहार समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळास एक वर्ष पूर्ण झाले असतानाही संबंधित मुंबई कार्यालयात आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज यांची प्रतिमा उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली होती.


या पार्श्वभूमीवर आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मुंबई येथे महामंडळाच्या कार्यालयात महाराजांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली. ही प्रतिमा कार्यालयात विधिवत लावण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
मुंबई कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रताप पवार यांनी प्रतिमा स्वीकारली. यावेळी श्री. गणेश भालके, दत्ताभाऊ कवसे, श्री. संजू भाऊ कोळंबेकर आदी उपस्थित होते.
लोहार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या या महामंडळाच्या कार्यालयात ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराजांची प्रतिमा असणे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे समाजातील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून शासनाच्या माध्यमातून समाजविकासाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
close