shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाचखोरी प्रकरणात एकाच कुटुंबातील तिघांना अटक!

पारोळा (जळगाव) | व्यायामशाळेच्या निधीसाठी लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सरपंच व त्यांच्या कुटुंबातील तिघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. पारोळा तालुक्यातील मेहू गावात घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
लाचखोरी प्रकरणात एकाच कुटुंबातील तिघांना अटक!

लाचखोरीचा प्रकार...

2017-18 ते 2022-23 या कालावधीत माजी सरपंच असलेल्या तक्रारदाराने ग्रामपंचायतीच्या व्यायाम शाळेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. 2023 मध्ये जिजाबाई गणेश पाटील सरपंच झाल्यानंतर तक्रारदाराने उर्वरित निधीसाठी मागणी केली.

सरपंच जिजाबाई पाटील यांनी 4 लाख रुपयांचा धनादेश दिला, तर उर्वरित 3 लाख रुपयांच्या मंजुरीसाठी लाच मागितली. सरपंच पती गणेश पाटील यांनी तडजोडीअंती 40 हजार रुपये लाच घेण्याची तयारी दर्शवली.

एसीबीचा सापळा...

तक्रार मिळताच जळगाव एसीबीने मेहू गावात सापळा रचला. खाजगी पंटर समाधान पाटील याने 40 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर सरपंच जिजाबाई पाटील, त्यांचे पती गणेश पाटील व मुलगा शुभम पाटील यांना अटक करण्यात आली.

कारवाईत जप्ती...

अटक आरोपींकडून 10 हजार 170 रुपये जप्त करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

एसीबीच्या पथकाची कामगिरी...

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू असून, लाचलुचपतविरोधी विभागाने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.



close