shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावगाड्यावरील जगणं सांगणारा साहित्यिक :प्रा.रा.रं.बोराडे

    साहित्य क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.मराठी ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करण्यात आपले महत्वाचे योगदान देणारे कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक प्रा. रा. रं. बोराडे यांचे  दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गावातील सुखदुःख मांडणारा साहित्यिक हरपला.  वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं असून त्यांच्या जाण्याने कलासृष्टीला मोठा धक्काच बसला आहे.

रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार   होते.इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत.

एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले बोराडे सर म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण संस्कृतीची एक साहित्यिक ओळख होती. त्यांच्या साहित्यातील ग्रामीण भागातली बदलती स्थित्यंतर आणि वास्तव चित्रण हे नेहमीच हृदयाला भिडणारे असायचे. अतिशय साधेपणानं राहणाऱ्या बोराडे सरांनी कथाकार-कादंबरीकार, बालसाहित्य लेखक, म्हणून मोठी ओळख मिळवली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारीचे कामही त्यांनी पार पाडले होते. 'पाचोळा', 'आमदार सौभाग्यवती' 'चारापाणी' अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा या कथासंग्रहासह 'शिका तुम्ही हो शिका' ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरले.
रावसाहेब रंगराव बोराडे यांचा जन्म डिसेंबर २५, इ.स. १९४०
अस्सल ग्रामीण जीवन जगणारे बोराडे यांची ग्रंथ संपदा फार मोठी आहे.
नाटक, साहित्य,
विनोद, तत्त्वज्ञान, ब्लॉग
साहित्य प्रकार
कथा, कादम्बरी, नाटक, समीक्षा, ब्लॉग
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ग्रामीण
चळवळ,ग्रामीण साहित्य चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती
पाचोळा आदी साहित्य त्यांचे प्रसिद्ध आहेत.त्यांना विविध पुरस्कार मिळाले.
उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे  राज्य पुरस्कार एकूण : ५ मिळाले.याशिवाय त्यांना फाय फाउंडेशन पुरस्कार,
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती,
यशवंतराव चव्हाण ,पुरस्कार,
अंबाजोगाई,
आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार,
मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार,
भैरूरतन दमाणी पुरस्कार,
जयवंत दळवी पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामांत सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करविली. खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला.११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता वृद्धापकाळाने एमजीएम रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे निधन झालं. ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.अशा महान साहित्यिक विनम्र अभिवादन!!

 प्रा. दिलीप आ. जाधव सांगली* 
 राज्य कोषाध्यक्ष
 कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.
close