अन्यथा मानव सुरक्षा सेवा संघाच्यावतीने उग्र आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष श्री.भुरे यांचा इशारा
रोहा / प्रतिनिधी:
रोहा जि.रायगड येथील मिल्लतनगर स्थित गौळवाडी रोड ता.रोहा जि.रायगड या परिसरात मौलाना सहिम गीरे व रोशनी कॉम्प्लेक्स पासुन ते इकरा स्कूल च्या दोन्ही बाजुस रस्त्याच्या कडेला प्रचंड झाडी झुटपे वाढली असून सरपटणारे विषारी प्राणी (सर्प,अजगर,मणेर वैगरे) यांचा या रस्त्यावर नेहमी वावर असल्याचे दिसून येत आहे,यासोबतच रस्त्याच्या कडेला तुंबलेल्या गटारीमुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी यासोबतच डासांचा मोठा प्रादुर्भाव परिसरात वाढला आहे.
तसेत याच परिसरात इकरा स्कूल आणी स्कूल चे खेळाचे मैदान असल्याने विद्यार्थी याठिकाणी खेळतात तसेच विद्यार्थ्यांसह नागरीकांना देखील याच रस्त्यावरुन ये - जा करावी लागते करीता अशा त्रिवेणी संकटाने विद्यार्थ्यांसह नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांनी मुख्याधिकारी रोहा नगर परिषद रोहा जि.रायगड यांना संबंधित विषयी निवेदन दिले आहे,
सदरील ज्वलंत प्रश्नी नगर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर जातीने लक्ष घालुन सदरील तुंबलेली गटार तथा वाढलेली झाडे- झुडपे साफ करत संबंधित परिसरातील नागरीक आणी विद्यार्थ्यांची समस्या दुर करावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच वेळीच लक्ष न दिले गेल्यास मानव सुरक्षा सेवा संघाच्यावतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांनी या निवेदनात शेवटी दिला आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

