नगर - स्वास्थदर्पण संचालित शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात २८ फेब्रुवारी २०२५, रोजी ३ रे राज्यस्तरीय चर्चासत्राचे व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बालीरेड्डी यांनी दिली.
या चर्चासत्रा साठी प्रमुख वक्ते डॉ. जयाप्रदा (शिक्षा साई, मेडिकल कोडिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अहमदाबाद ), डॉ. संतोष छाजड (एम इ टी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक) व डॉ. सतीश पोलशेट्टीवार (एम आय टी, फार्मसी कॉलेज, पुणे) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. जयदीप पवार यांनी दिली.
या राज्यस्तरीय चर्चासत्रा सोबतच राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तसेच डी. फार्मसी व बी. फार्मसी अशा दोन स्वतंत्र गटात राज्यातील फार्मसी विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती प्रा. राजू डहाळे यांनी दिली. सदर स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रा.राजू डहाळे (९१३०९८२८५४) यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. प्रियांका साबळे यांनी केले. या राज्यस्तरीय चर्चासत्रा साठी डॉ. प्राची कानवडे, प्रा. कांचन जाधव, प्रा. निरंजन तिवारी, प्रा. सुयोग देवडे, प्रा. शितल वाघमारे प्रा. रितुल गंगावणे, प्रा. प्रा.विकास पळसकर तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजनासाठी प्रा. विद्या पवार, प्रा. अयोध्या खेडकर, प्रा. मयुरी टाक, प्रा. निशांत थोरात, आदी प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय विज्ञान दिना दिवशी हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून आयोजित करण्यात येतो आणि यामुळे फार्मसी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे आणि सचिव प्रा. सोनाली शिंदे यांनी सांगितले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

