shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट कडून डी. एम.चौधरी यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

अजीजभाई शेख/ राहाता
राहाता शहरातील वै.ह.भ.प. सजन यशवंत सदाफळ पा. वै.भाऊसाहेब सजन सदाफळ पा. यांचे स्मरणार्थ जगद्गुरु संत तुकाराम बिज महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन राहाता येथील पंधरा चारी उपनगरात रविवार दिनांक १६/०३/ २०२५ रोजी करण्यात आले असून सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान बिज किर्तन सेवा भागवत कथाकार श्री विकास महाराज गायकवाड यांचे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जिवन चरित्रावर किर्तन सेवा होणार आहे. तद्नंतर बालकन्या संस्कृती सदाफळ ही श्री तुकाराम महाराजांच्या जिवनपटावर माहिती सादर करणार आहे. तद्नंतर शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या हस्ते गोगलगांव येथील डी.एम. चौधरी (सेवानिवृत्त वरिष्ठ शाखाधिकारी बँक ऑफ बडोदा, सी.ई.ओ. गौतम बँक) यांना समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 


सदर कार्यक्रम प्रसंगी ट्रस्ट च्या वतीने सर्व उपस्थित भाविकांना श्रीमद भगवत गिता भेट देण्यात येणार असल्याचे मार्गदर्शक बाळासाहेब गुळवे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरवर्षी ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरींसाठी अनेक ग्रामीण भागात शाखा स्थापन करणारे डी.एम.चौधरी यांना जाहीर झाला असून त्यांनी त्याकाळी विविध समस्यांना सामोरे जात कठीण परिस्थितीत समाजाची मदत मिळवून शिक्षण घेतले. म्हणूनच त्यांनी समाजासाठी व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी साठी बँकींग क्षेत्रात विशेष कार्य केल्याने भावी पिढीला त्यांचे मार्गदर्शन फार मोलाचे ठरणार असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. रामनाथ सदाफळ पा. यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.श्री.चौधरी यांना मिळालेल्या या पुरस्कारबाबत विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close