shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे पाच दिवस कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ संपन्न.

इंदापूर येथे पाच दिवस कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ संपन्न.
 इंदापूर : इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारपासून शरद कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटन बारामती अग्रो चे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांच्या हस्ते संपन्न झाले.
 यावेळी  राष्ट्रवादीचे  तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंह पाटील,तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारणी सदस्य अमोल भिसे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, महिला तालुका कार्याध्यक्ष अस्मा मुलांनी, किसन जावळे, अनिकेत निंबाळकर, शहराध्यक्ष ॲडव्होकेट इनायत काझी,रेश्मा शेख,  तमन्ना शेख, रूपाली रणदिवे, देविदास भोंग,अमोल मुळे, संजय शिंदे, समद सय्यद, राजाराम सागर, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, मयूर शिंदे, अक्षय कोकाटे, पूजा कांबळे,बानू सय्यद,गणेश धांडोरे,किरण लावंड,कृषी अधिकारी  गणेश सूर्यवंशी, जय मेटे, किरण पिसाळ व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
आदी उपस्थित होते. 
दरम्याच्या काळात इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, कृषी विभागाचे प्रभारी कृषी अधिकारी योगेश फरतडे,
 इंदापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फरतडे उपस्थिती दर्शवली.
सोमवार पर्यंत  चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतातील एआय या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत चर्चासत्रासह विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती अवजारे,बी बियाणे, कीटकनाशके, हरितगृह व इतर साहित्य कृषी जैविक तंत्रज्ञान, मासेमारी, डेरी तंत्रज्ञान,कुकूटपालन तंत्रज्ञान,शेतमाल प्रक्रिया उद्योग,अपारंपारिक ऊर्जा, कृषी बाजार, ठिबक सिंचन,शेळी मेंढी पालन माहिती, सौर ऊर्जा माहिती, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस यांच्यासह खाऊ गल्ली बचत गटांच्या पदार्थांचे स्टॉल असे एकूण २०० हून अधिक स्टॉल आहेत अशी माहिती आयोजक कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.
close