shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांच्या आरोग्यासाठी जागरूकता – श्रीराम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.

  एरंडोलयेथील श्रीराम चौक, बुधवार दरवाजा परिसरात श्रीराम प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात महिलांच्या आरोग्यासह त्यांच्या सशक्तीकरणावर भर देण्यात येतो. यंदा ८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

महिलांच्या आरोग्यासाठी जागरूकता – श्रीराम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि तुळशी पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मृणाल अमोल पाटील उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना मृणाल पाटील यांनी महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे प्रेरणादायी विचार मांडले.

महिलांच्या आरोग्यासाठी जागरूकता – श्रीराम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.

आरोग्यविषयक चर्चेत, डॉ. गीतांजली ठाकूर (नचिकेत सोनोग्राफी सेंटर) यांनी महिलांनी शारीरिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे असा महत्त्वाचा सल्ला दिला. डॉ. प्रियंका वाघ (पद्मालय हॉस्पिटल) यांनी नियमित आहार व जीवनशैली सुधारण्यावर भर दिला.

माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे यांनी संस्कृतीच्या जतनाविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ. असावरी पाटील (पाटील हॉस्पिटल) यांनी महिलांच्या शारीरिक बदलांविषयी मार्गदर्शन केले. जयश्री पाटील (जिल्हा नियोजन मंडळ सदस्य) यांनी अध्यात्म आणि आरोग्य यांचा परस्परसंबंध उलगडला.

कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सरला पाटील, जयश्री महाजन, शोभा पाटील, नीता महाजन, डॉ. साक्षी महाजन, आचल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योत्स्ना जाधव यांनी, तर सूत्रसंचालन खुशी वाणी यांनी केले. आभार प्रदर्शन जयश्री महाजन यांनी व्यक्त केले.

महिला आरोग्यासाठी पुढील उपक्रम...

महिलांच्या आरोग्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानतर्फे स्तन कॅन्सर तपासणी (मेमोग्राफी) शिबिर आणि मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदानंद पाटील, ऋषिकेश महाजन, अविनाश जाधव, ज्ञानेश्वर गुजर, बाळा पाटील, टोनी शिरवानी, ओम पाटील, पुष्पक पाटील, धीरज पाटील आणि प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.


close