shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडा गावच्या ग्रामपंचायत सदस्या राजश्रीताई पवार यांची इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड.

रेडा गावच्या ग्रामपंचायत सदस्या राजश्रीताई पवार यांची इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रेडा गावच्या ग्रामपंचायत सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.राजश्रीताई पवार यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्षपदी क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले.
 यावेळी इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी महिला  उपस्थितीत होत्या.
 यावेळी इंदापूर तालुक्यातील भिगवन जिल्हा परिषद गटातील महिला पदाधिकाऱ्यांना   नियुक्ती पत्र वाटप  मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले .

 यावेळी  पक्षवाढीच्या कार्यासाठी मंत्री भरणे यांनी नवनियुक्त सर्व महिला पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

अधिक माहिती देताना राजश्रीताई पवार म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पद दिले आहे.या पदाचा उपयोग रेडा गावातील आणि  तालुक्यातील सर्व महिलांना लाभ आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तसेच पक्षाच्यावतीने  महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
close