shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहराच्या विकासासाठी कटिबद्ध – न.पा. प्रशासक अमोल बागुल यांची ग्वाही.

सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या विशेष कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन.

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल नगरपरिषदेच्या प्रशासनाचा कारभार सुरळीत चालवून शहरवासीयांना आवश्यक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही न.पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल यांनी दिली.

शहराच्या विकासासाठी कटिबद्ध – न.पा. प्रशासक अमोल बागुल यांची ग्वाही

सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात त्यांचा विशेष सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी बागुल यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला संघाचे संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ संचालक प्रा. शिवाजीराव अहिरराव, नामदेवराव पाटील यांनी शहरातील पावसाळ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, गटारींची दुरवस्था तसेच अंजनी नदी संबंधित तक्रारींवर प्रकाश टाकला.

शहराच्या विकासासाठी कटिबद्ध – न.पा. प्रशासक अमोल बागुल यांची ग्वाही

यावर प्रतिक्रिया देताना प्रशासक अमोल बागुल यांनी सांगितले की, “नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. तक्रारींचे निरसन करून उत्तम सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.”

पावसाळ्यात खराब रस्त्यांमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संघर्ष समितीच्या मागण्या आणि शहराच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना राबवली जातील, असे सांगत नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये व थेट कार्यालयात येऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी निंबा बडगुजर यांनी केले, तर आभारप्रदर्शन नामदेवराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म" या प्रार्थनेने झाली, तर समारोप संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने करण्यात आला.

close