नगर प्रतिनिधी:
वाकडी येथील रहिवासी असलेले भानुदास विश्वनाथ पा. लबडे यांचे आज, गुरुवार दि. १९ रोजी पहाटे ४:२५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी समजताच वाकडी व पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास लबडे हे काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२:३० वाजता त्यांच्या वाकडी येथील 'लबडे वस्ती' या राहत्या घरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वसंत भानुदास लबडे, भाऊसाहेब भानुदास लबडे यांच्यासह मोठा लबडे परिवार असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या दुःखात संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सचिव सहसचिव व संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत संस्थेच्या वतीने व कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

