shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श शैक्षणिक संकुलात शिवजयंती उत्साहात संपन्न; हा सत्कार माझा नव्हे, तर 'शिवविचारांचा' सन्मान! – प्रमुख पाहुणे पत्रकार तुषार महाजन


सोशल मीडियाच्या युगात दिशा हवी असेल तर ‘शिवचरित्र’ हाच दीपस्तंभ!

शिर्डी प्रतिनिधी: 
शिर्डी येथील आदर्श शैक्षणिक संकुलातील 'आदर्श बाल प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर व इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये शिवजयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. शिवचरित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या विशेष व्याख्यान सोहळ्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रबोध जोशी सर आणि सचिव अशोकभाऊ गोंदकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिवव्याख्याते प्रफुल्ल खपके यांचे मार्गदर्शन:
कार्यक्रमात शिवव्याख्याते श्री. प्रफुल्ल खपके यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास उलगडला. त्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची जिद्द आणि रयतेविषयीचे प्रेम यावर मार्गदर्शन करत शिवचरित्र केवळ वाचण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला.
उत्कृष्ट नियोजन आणि सांगता:
या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन धनवटे मॅडम, रोकडे मॅडम, खरात मॅडम, नन्नवरे मॅडम आणि उगले मॅडम यांनी केले. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन त्रिभुवन मॅडम यांनी अतिशय बहारदारपणे केले. तर, कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार श्री. भोगडे सर यांनी मानले.


हा सन्मान केवळ माझा नसून 'शिवविचारांचा' आहे! – पत्रकार तुषार महाजन

या शानदार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, पत्रकार तसेच ग्रीन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुषार संजय महाजन उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर ते म्हणाले, "शिवरायांचे विचार, हेच आमचे संस्कार! आदर्श विद्यालयाने केलेला हा माझा सन्मान नसून तो खऱ्या अर्थाने शिवविचारांचा सन्मान आहे, असे मी मानतो. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील चमक आणि त्यांच्या मुखातून निनादलेला 'जय भवानी, जय शिवाजी'चा नाद मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देऊन गेला. आजच्या पिढीने शिवरायांचे धैर्य अंगी बाणवणे गरजेचे आहे.
close