सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथे वाळु भरलेल्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वार भावी नवरदेवाचा मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना दि.२१ मार्च शुक्रवार रोजी घडली होती.या प्रकरणी टिप्पर चालकास मा.न्यायालयाने तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर फरार चालकाच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर गोरेगांव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले मात्र टिप्पर मालक अद्याप ही फरारच आहे.
सेनगांव तालुक्यातील कापडशिंगी येथील २५ वर्षीय युवक भावी नवरदेव गणेश उत्तम तनपुरे याचे लग्न दि.२४ मार्च सोमवार रोजी असल्याने तो दुचाकी एम.एच.३८ एसी ६६२५ वरुन वाघजाळी येथे नातेवाईकास आनायला जात असतांना आजेगांव येथील चौकात अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या टिप्पर क्र.एम.एच.२८ बी बी २१११ च्या चालकाने पाठीमागुन जोराची धडक देऊन गणेश तनपुरे यांना सुमारे शंभर फुट पर्यंत फरफरट नेल्याने जागीच मृत्यु झाला होता.टिप्पर चालक टिप्पर घेऊन फरार झाला होता.त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृत्युदेह गोरेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आनला परंतु आरोपीला जो पर्यंत आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता.
आधीच सेनगांव तालुक्यात वाळुमाफीयाचा सुरु असलेला उच्छाद आणि त्यात घडलेली दुर्दवी अपघाताची घटना पाहता सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.आरोपीला तात्काळ अटक करुन कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरीकांकडून पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर टायर पेटवत निषेध व्यक्त करीत रास्तारोको करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्या नंतर टिप्पर चालकास अटक करण्यात आली.या प्रकरणी मयताचे वडील उत्तम श्रीरंग तनपुरे यांच्या फिर्यादीवरुन टिप्पर चालक अभिजीत मधुकर सरकटे रा.वंजारवाडा हिंगोली व टिप्पर मालक पंकज होडगीर रा.हिंगोली या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.टिप्पर चालकास गोरेगांव पोलीसांनी दि.२२ मार्च शनिवार रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चालक अभिजीत सरकटे यास तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर टिप्परचा मालक अद्याप ही फरार आहे.
फरार आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल
रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,शिवसेना तालुका संघटक प्रविण महाजन,निखिल पानपट्टे,नामदेव पतंगे,संतोष गुडदे,आनंदा बोडखे यांच्यासह पाच ते सात जणाविरुध्द गोरेगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याची जशी तत्परता दाखवली अशीच तत्परता अवैध धंदेचालकावर करुन दाखवावी:-गजानन पाटील
"अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या टिप्परने दलीत आदीवाशी समाजातील शेतकरी कुटुंबातील गरीब असलेल्या भावी नवरदेवाला जोराची धडक दिली व त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला आणि फरार झालेल्या आरोपीला तात्काळ अटक करणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केले तर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याची जशी तत्परता पोलीसांनी दाखवली अशीच तत्परता अवैध वाळुमाफीया,गुटखामाफीया,मटकामाफीया यांच्यावर गुन्हे दाखल करुन पुर्ण अवैध धंदे बंद करुन दाखवावी.अवैध धंद्याविषयी पोलीसांनी तत्परता दाखवली नाही अन ते बंद केले नाहीत तर मुंबई येथे मंत्रालयावर आंदोलन करु"
गजानन कावरखे रा.गोरेगांव
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष