सेनगांव/विश्वनाथ देशमुख:
राष्ट्रीय आरोग्य अभियान व केंद्र शासनाच्या महत्वपुर्ण बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या विशेष मोहीमेचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राज्यस्तरावर करण्यात आले.त्या अनुषंगाने सेनगांव तालुक्याचे उदघाटन दि.४ मार्च मंगळवार रोजी स्व.मातोश्री लक्ष्मीबाई येवले विद्यालयात करण्यात आले व राज्यस्तरीय सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा चिकीत्सक डाँ.नितीन तडस,अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डाँ.मंगेश टेहरे,डाँ.गोपाल कदम,डाँ.शैलेजा कृपास्वामी,जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.कैलास शेळके,डाँ.फोफसे,श्री गाभणे,श्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगांव तालुक्याचे उदघाटन स्व.मातोश्री लक्ष्मीबाई येवले विद्यालयात करण्यात आले व राज्यस्तरीय उदघाटनाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.यावेळी येवले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांना लगेच औषधोपचार करण्यात आले.तसेच गंभीर आजार असणाऱ्या बालकांना पुढील उपचारासाठी सेनगांव ग्रामिण रुग्णालय व हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन राठोड,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सतिश रुणवाल,शिक्षण विभाग व आय.सी.डी.एस.विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
वैद्यकीय अधिकारी डाँ.सुरज शिंदे,डाँ.नारायण शिंदे यांनी आरोग्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय येवले व सर्व शिक्षकवृंद,ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.विशेष तपा सणी मोहीम मार्च महिनाभर राबविण्यात येणार असुन या योजनेत शालेय तसेच अंगणवाडी मधील बालकांची तपासणी केली जाणार आहे तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



