shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहा ग्लोबल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात.

शहा ग्लोबल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात.
इंदापूर : लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो धन्य, ऐकतो मराठी...! अशा सुरेल गायनाने मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात करण्यात आली. इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सुरेल मराठी गीतांचे गायन केले.

गुरुवार ( दि. 27 फेब्रुवारी )  रोजी सकाळच्या प्रहारात, मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्कुलच्या नर्सरी क्लास मधील विद्यार्थ्यांनी चारोळी सादरीकरण करत, मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला.  तसेच स्कूल मधील प्ले ग्रुपच्या मुलांनी, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय..! हे गीत सादर केले. तर के टू क्लासच्या विद्यार्थ्यांनी, स्वच्छतेचा जागर याविषयी सुंदर असे पथनाट्य सादर केले. 

तसेच विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील शिक्षिका यांनी, मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य साधून, सामूहिक गायन केले. यामध्ये उत्तुंग भरारी घेऊ या...! या गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याने, शहा ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक अंगद शहा यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
close