shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने वायरमन डे निमित्त महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान.

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने वायरमन डे निमित्त महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान.
इंदापूर : ४ मार्च   रोजी महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित इंदापूर येथे जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अहोरात्र वर्षभर वीजेची सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा वायरमन डे निमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने
 सन्मान करून  साजरा करण्यात आला .

इंदापूर येथे लाईनमन राहुल पळसे, महेश टफले ,फारुख शेख ,दत्तात्रेय देवकर, विज वितरणचे अधिकारी  प्रमोद कुमार जाधव, उप कार्यकारी अभियंता गणेश जाधव,  उत्तम गायकवाड, शिपाई सतीश बनसोडे,दीपक चौगुले इत्यादीचा इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीतर्फे सर्वांना हार ,गुलाब पुष्प  देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी इंदापूर नागरी संघर्ष समितीचे  प्रा .कृष्णा ताटे संघर्ष समितीचे मार्गदर्शक, हमीद आत्तार,  महादेव चव्हाण ,  अमर गाडे , भारत बोराटे , अस्लम बागवान माऊली राऊत इ . अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
close