shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवच्या निबंध स्पर्धेत काकडे अमरसिंह प्रथम तर कु.कल्पना कदम द्वितीय तर संध्या धपाटे तृतीय !!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :

बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथे संविधान गौरव महोत्सव २०२५ अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दिनांक  १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.





ही  निबंध स्पर्धा राज्य घटना व महिला सबलीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर घेण्यात आली होती.

         या स्पर्धेत प्रथम क्रमांक अमरसिंह काकडे तर द्वितीय कु.कल्पना कदम ही आली तर संध्या धपाटे ही तृतीय आली आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव मा.रमेशराव आडसकर, प्राचार्य डॉ.माधवराव फावडे, मराठी विभाग प्रमुख डॉ.सी.एन.सोळंके, डॉ.प्रशांत क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.

close