सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रामचंद्र धाकतोडे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या हिंगोली युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्तपत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडीतराव तिडके,प्रदेश कार्याध्यक्ष रामदास गिरे-पाटील,उपाध्यक्ष अमरजित सिंग काँलरा यांच्या हस्ते दि.२ मार्च रविवार रोजी देण्यात आले.या निवडीबद्दल धाकतोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विठ्ठल रामचंद्र धाकतोडे हे मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरुन विविध आंदोलने करीत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्या अनेक आंदोलनाने शेतकऱ्यांना न्याय देखील मिळाला याच कामाची पावती म्हणुन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडीतराव तिडके,प्रदेश कार्याध्यक्ष रामदास गिरे-पाटील,प्रदेश उपाध्यक्ष अमरजित सिंग काँलरा यांनी धाकतोडे यांची हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात दि.२ मार्च रविवार रोजी समितीच्या आढावा बैठकीत नियुक्ती पत्र देत हिंगोली युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली.यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष शंकरराव देशमुख,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,परभणी जिल्हाध्यक्ष अनंत कचाले,नांदेड जिल्हाध्यक्ष गजानन गव्हाणे,मराठवाडा संघटक सचिन दराडे,हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई थिटे,परभणी महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई मनेरे,युवती जिल्हाध्यक्ष अँड.अलकाताई साळवे,वसमत तालुकाध्यक्ष जावेद अन्सारी,हिंगोली तालुकाध्यक्ष प्रभाकर भिसडे,विभागीय युवा अध्यक्ष अनिल लोंढे,जिल्हा मुख्य संघटक बाळासाहेब बोंगाणे,हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे,वसमत उप तालुकाध्यक्ष भगवान शिवभगत आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


