सेनगांव/विश्वनाथ देशमुख
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनची हिंगोली,परभणी,नांदेड जिल्ह्याची आढावा बैठक दि.२ मार्च रविवार रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.यावेळी नविन पदाधिकाऱ्यांना समितीमध्ये घेऊन पदासह ओळखपत्राचे वाटप करुन जबाबदारी देण्यात आली तसेच जळगाव जिल्ह्यातील राजगड येथे दि.८ व ९ मार्च २०२५ दोन दिवसीय अभ्यास शिबिरास जाण्याचे नियोजन करण्यात आले व संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा तपशील आढावा घेण्यात आला.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापुरकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडीतराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली,परभणी व नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत नविन पदाधिकाऱ्यांना समितीमध्ये नविन पदासह ओळखपत्राचे वाटप करुन जबाबदारी देण्यात आली व संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा तपशीलवार आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.संघटनेचे जळगाव जिल्ह्यातील राजगड येथे दि.८ व ९ मार्च दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास हिंगोली,परभणी व नांदेड जिल्ह्यातील महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने कसे उपस्थित राहु शकतील याचा आढावा घेण्यात आला.संघटनेतील सक्रीय सदस्यांना प्रदेशाध्यक्ष पंडीतराव तिडके,कार्याध्यक्ष रामदास गिरे-पाटील,प्रदेश उपाध्यक्ष अमरजित सिंग काँलरा यांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी मराठवाडा संघटक सचिन दराडे,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,परभणी जिल्हाध्यक्ष अनंत कचाले,नांदेड जिल्हाध्यक्ष गजानन गव्हाणे,हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई थिटे,परभणी महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई मनेरे,युवती जिल्हाध्यक्ष अँड.अलकाताई साळवे,वसमत तालुकाध्यक्ष जावेद अन्सारी,हिंगोली तालुकाध्यक्ष प्रभाकर भिसडे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल लोंढे,युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल धाकतोडे,जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे,जिल्हा मुख्य संघटक बाळासाहेब बोंगाणे,वसमत उप तालुकाध्यक्ष भगवान शिवभगत आदीसह पुरुष व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

