shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव येथे अनुसुचीत जमातीतील शेतकऱ्यांसाठी पशु पालन प्रशिक्षण कार्याशाळा संपन्न

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

पशुपालन क्षेत्रातील संधी,आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञाना बद्दल अनुसुचीत जातीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय पशुचिकीत्सा अनुसंधान संस्थान,प्रशिक्षण व शिक्षण केंद्र पुणे आणि पशु संवर्धन महाराष्ट्र शासन हिंगोली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.४ मार्च मंगळवार रोजी सेनगांव शहरातील व्हि.के.देशमुख मंगल कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.





या प्रशिक्षण कार्यशाळेला हिंगोली जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ.एस.बी.खुने,सेवानिवृत्त प्रादेशीक पशु संवर्धन सह आयुक्त लातुर डाँ.आर.आर.चंदेल,शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय डाँ.तुकाराम भुक्तर,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डाँ.आर.ए.कलापुरे,डाँ.पि.एस.निचळ,समाज कल्याण विभाग श्री एस.गोवंडे,पशुधन विकास अधिकारी डाँ.टि.के.भिसे,डाँ.साई पवार,डाँ.नुर शेख,डाँ.श्रीकांत बी देवकर,डाँ.अमोल भालेराव आणि डाँ.संघरत्न बहीरे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी पशुपालन व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेत पशुपालकांसाठी उपयोगी अशा माहीती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.यामध्ये डाँ.आर.आर.चंदेल यांनी दुग्ध व्यवसाय,दुध उत्पादक जाती,मुल्यवर्धक आणि गांडुळ खत निर्मितीचे महत्व सविस्तर सांगितले डाँ.आर.ए.कल्याणपुरे यांनी शासनाच्या विविध पशुपालन अनुदान योजनेची माहीती आणि लाभ या विषयी सविस्तर माहीती दिली.डाँ.संघरत्न बहिरे यांनी शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यावसायातील संधी,शेळ्यांचे व्यवस्थापन,खाद्य व आरोग्याचे नियोजन बद्दल सविस्तर माहीती दिली,डाँ.तुकाराम भुक्तर यांनी चारा व्यवस्थापन,मल्टीकट गवत,सायलेज निर्मिती आणि चारा पिकाचे महत्व सांगितले,डाँ.अमोल भालेराव यांनी पशूपालन क्षेत्रातील नव्या व्यवसाय संधी आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्या बद्दल माहीती दिली.बँक प्रतिनिधी शंकर चोपडे यांनी पशुपालनासाठी बँक कर्ज,अर्ज प्रक्रीया आणि वित्तीय योजनेबद्दल माहीती सांगितली.यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत पशुसंवर्धन क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रकाशवाट शेतकरी उत्पादक कंपनी मर्या.व आरंभ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय निर्मिती करुन स्थानिक पुरूष व महिलांकरीता रोजगार निर्मिती करणाऱ्या आजेगाव येथील सौ.ज्योती तुकाराम भुक्तर,पळशी येथील प्रगतशील कुक्कुट पालन व्यावसायीका सौ.आम्रपाली गजानन नरवाडे,शासकीय योजनेतुन प्राप्त शेळी गटातुन यशस्वीरीत्या संगोपन व आर्थिक प्रगती केलेल्या पुसेगांव येथील सौ.अलका रतन इंगोले यांचा सत्कार करण्यात आला.कार्यशाळेच्या समारोपात डाँ.एस.बी.खुने आणि डाँ.संघरत्न बहीरे यांनी पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाना वापर करुन शाश्वत शेती करण्याचा सल्ला दिला.

यावेळी सिध्देश्वर दुग्ध प्रक्रीया उद्यागाचे डाँ.केशव वाघमारे,इंजि.मेटकर व नंदकीशोर खिल्लारे आणि सेनगांव तालुक्यातील विविध महिला बचत गट प्रतिनीधीसह ६०० शेतकरी उपस्थित होते‌.विशेष म्हणजे यामध्ये महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय भाकृअनुप-भारतीय पशुचिकीत्सा अनुसंधान संस्थान,प्रशिक्षण व शिक्षण केंद्र पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ.संघरत्न बहीरे,डाँ.अमोल भालेराव आणि सेनगांव तालुका पशुधन विकास अधिकारी डाँ.श्रीकांत देवकर यांनी केले.या प्रशिक्षणातुन शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर कसा करता येईल याची सखोल माहीती मिळ्याने उपस्थित शेतकऱ्यातुन समाधान व्यक्त केले जात आहे.

close