shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव पंचायत समितीत ४३ लाख ७७ हजाराचा अपहार;सहाय्यक लेखाधिकाऱ्यासह चौघांवर सेनगांव पोलीसात गुन्हा दाखल..

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

सेनगांव पंचायत समितीत लेखा विभागात ४३ लाख ७७ हजार ५५९ रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखाधिकाऱ्यासह चौघांवर दि.५ मार्च बुधवार रोजी सेनगांव पोलीस स्टेशनला गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागाने कंत्राटदाराकडुन कामगार विमा व इतर रक्कम कपात करुन सदर रक्कमेची देयके संबधीत विभागाला दिले नाही.त्या नंतर देयकाचे धनादेश व त्या सोबतच शेड्युल लावुन सदर रक्कम व्यैयक्तीक खात्यावर वर्ग केली होती या प्रकरणात अपहाराचा गुन्हा दाखल करावा असा अहवाल लेखा विभागाने सादर केल्यामुळे जिल्हा परीषद मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांना प्राधिकृत केले होते.


त्यावरुन गटविकास अधिकारी माधव कुंडलीक कोकाटे यांनी दि.५ मार्च बुधवार रोजी सेनगांव पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद दिली.ज्यामध्ये सहाय्यक लेखाधिकारी नितीन अंबादासराव बंडाळे,प्रभारी सहाय्यक लेखाधिकारी हरीशचंद्र शिंदे,अनिल विश्वनाथ गव्हाणकर,कनिष्ठ सहाय्यक नितीन मदनलाल शर्मा सर्व पंचायत समिती सेनगांव यांनी येथे कार्यरत असतांना संगणमत करुन १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ च्या दरम्यानच्या कालालधीत पंचायत समिती स्तरावरील जिल्हा परीषद निधी अभिकरण योजना जि.प. उपकर,पंचायत समिती उपकर, १५ वा वित्त आयोग व पंचायत राज सेवार्थ (सीएमपी) आदी रक्कमेच्या रोख वह्यामध्ये नोंद करण्यात आलेल्या आयकर,विमा कामगार कल्याण निधी मुल्यवर्धीत कर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी आदी निधीमधुन एकुण ४३ लाख ७७ हजार ५५९ रक्कमेचा शासकीय निधीचा अपहार करुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या फिर्यादीवरुन नितीन बंडाळे,दत्तात्रय शिंदे,अनिल गव्हाणकर,नितीन शर्मा या चौघावर सेनगांव पोलीस स्टेशन मध्ये ८३/२०२५ कलम ४२०,४०९,३४ भा.द.वि.नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शालीनीताई नाईक ह्या करीत आहेत.

close