shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त उद्यापासून कान्हेगांवमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन



श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव (वर्ष ६८ वे ) निमित्त तालुक्यातील कान्हेगांव (तुकाराम महाराजांचे) येथे उद्यापासून गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या सदैववैकुंठ गमन बीज उत्सवाच्या निमित्ताने कान्हेगांव येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरांमध्ये ह भ प गुरुवर्य महंत रामगिरी महाराज  (गोदावरी धाम सरला बेट ) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक ९ मार्चपासून ते १६ मार्चपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण व किर्तन सोहळा संपन्न होत आहे यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह कीर्तन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये पहाटे ४ ते ६  काकडा भजन, सकाळी ७ ते १२ गाथा पारायण ,दुपारी २ ते ४ संत तुकाराम महाराज चरित्र, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० किर्तन अशी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
रविवार दिनांक १६  मार्च २०२५ रोजी ह भ प गुरुवर्य महंत रामगिरी महाराज मठाधिपती (गोदावरी धाम सरला बेट) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल,
महाप्रसादाचे अन्नदाते शिवाजी रावसाहेब खरात यांची काल्याची पंगत होणार आहे.तरी बीजे निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे संत तुकाराम महाराज सप्ताह नियोजन कमिटी व भक्त मंडळ व कान्हेगांव ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
संतोष देवराय - कान्हेगांव 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर -9561174111
close