क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांची पंचायत समितीला निवेदनाव्दारे इशारा
सेनगांव/विश्वनाथ देशमुख
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सेनगांव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडुन काही अभियंते पैसे घेऊन कामे करीत आहेत पैसे न दिल्यास घरकुलाचे देयके दिली जाणार नाहीत असे सांगितले जात असल्याने संबधीत अभियंत्यावर कारवाई करावी अन्यथा पैसे उधळुन आंदोलन केले जाईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दि.४ मार्च मंगळवार रोजी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
सेनगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाची कामे चालु आहेत परंतु सर्वसामान्य नागरीकांना घर देण्याच्या नावावर पंचायत समितीचे काही अभियंते पैसे घेऊन कामे करीत आहेत.पैसे न दिल्यास घरकुलाचे देयके पडणार नाहीत असे सांगितले जात आहे.त्यामुळे संबधीत अभियंत्यावर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी दि.२५ फेब्रुवारी रोजी ताकतोडा येथील मोबाईलच्या मनोऱ्यावर काही जणांनी चढुन अनोखे आंदोलन केले होते.परंतु त्यावर कोणती ही कार्यवाही झाली नसल्याने आता या संदर्भात दि.४ मार्च रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सेनगाव पंचायत समिती कार्यालयात निवेदन दिले.या प्रकरणात जिल्हा परीषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी या करीता पैशाचा ड्रेस घालून निवेदन दिले जाईल तसेच त्याची दखल न घेतल्यास पैसे उधळुन आंदोलन केले जाईल असा इशारा नामदेव पतंगे यांनी दिला आहे.निवेदनावर प्रविण मते,शामकुमार मते,राजेश मते,दशरथ मुळे,दिपक सावके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


