shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञान,कला,क्रीडा व कृषी प्रतिष्ठान कळंब येथे विध्यार्थांसाठी संवाद स्पर्धा परीक्षार्थीशी मार्गदर्शन व्याख्यान संपन्न


कळंब -  ज्ञान,कला,क्रीडा व कृषी प्रतिष्ठान कळंब येथे विध्यार्थांसाठी संवाद स्पर्धा परीक्षार्थीशी मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. ज्ञान,कला,क्रीडा व कृषी प्रतिष्ठान कळंब आणि महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 07 मार्च 2025 रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ज्ञान,कला,क्रीडा व कृषी प्रतिष्ठानच्या प्रशस्त सभागृहात मा.डॉ.अरुण अडसूळ सर (मा.सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई व मा.कुलगुरू पुणे विद्यापीठ, पुणे) यांचे स्पर्धा परीक्षा तयारी बाबतचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व्याख्यान संपन्न झाले. 

      आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अरुण अडसूळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून MPSC,UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना अविश्रांत मेहनत , टाईम मॅनेजमेंट , शारीरिक आणि मानसिक स्वास्थ यांचे नियोजन कसे असावे याबाबत माहिती दिली. तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना, शिक्षकांना डॉ.अरुण अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी डॉ.अरुण अडसूळ यांच्या वैशिष्टपूर्ण सादरीकरणाला टाळ्यांच्या  कडकडाटाने भरभरून प्रतिसाद दिला. त्याचबरोबर मा.विजयराज चंदनकर, कृषी अधिकारी यांनी विध्यार्थाना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.

       या कार्यक्रमाला कॉलेजचे 1000 हून अधिक विद्यार्थी , प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे अध्यक्ष मा.उत्तम दादा फडतरे, संस्थेचे सचिव मा. दत्तात्रय फडतरे, प्राचार्य डॉ. प्रविण उत्तेकर, डॉ.विपुल निंबाळकर, डोंबाळे मॅडम आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ह्या प्रसंगी महाविद्यालयामधील  प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.उल्का मोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मीरा देवकर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेच्या मुख्य लेखापाल मोनिका आखाडे, ग्रंथपाल तुषार साबळे यांनी परिश्रम घेतले.
close