shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परभणी येथील मातंग समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या..

सकल मातंग समाज बांधवाचे सेनगांव तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


सेनगांव/विश्वनाथ देशमुख

परभणी येथील मातंग समाजाच्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच पिडीत मुलींच्या कुंटुबाला आर्थिक मदत करण्यात यावी या मागणीचे निवेदन सेनगांव तालुका सकल मातंग समाज बांधवाच्या वतीने दि.५ मार्च बुधवार रोजी तहसिलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.



परभणी शहरातील मातंग समाजातील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असुन या प्रकरणातील आरोपी यशोदीप कनकुटे व श्रावण टेकुळे या दोघांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पिडीत मुलींच्या कुंटुबांला आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा हिंगली जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी लहु क्रांती संघर्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन कांबळे,सेनगांव तालुकाध्यक्ष विलास सुतार,भारतीय टायगर सेना तालुकाध्यक्ष सचिनभैया जाधव,अँड.मधुकर कांबळे,अँड.दिपक रणबावळे,सामाजिक कार्यकर्ते गणेश सुतार,गजानन खंदारे,एच. आर.अवचार,केशव भालेराव आदीसह मातंग समाज बांधव उपस्थित होते.

close