इंदापूर : कांदलगाव (ता.इंदापूर) येथील व पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ निलोफर रज्जाक पठाण यांना सावता सावित्री वधू वर संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये सामाजिक कार्यात सहभाग,सामाजिक आस्था आणि सामाजिक कार्य याची दखल घेत सावित्रीच्या लेकी या विशेष पुरस्काराने माळी समाज उपवर वधू वर परिचय मेळाव्याप्रसंगी
सन्मानित करण्यात आले.
सावित्रीच्या लेकी विशेष पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वाघोले, अध्यक्ष मारुती भुजबळ, सचिव प्रकाश गडवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला.
निलोफर रज्जाक पठाण या
सामाजिक आस्था आणि सामाजिक कार्य,महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण यावर असलेले कार्य, महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून उद्योग व्यवसाय उभारून त्यांना उभारी देण्याचे काम,महिलांना विविध योजनांचा लाभ करून दिला तसेच महापुरुषांच्या जयंती, हळदीकुंकू, संविधान दिन ,महिला दिन असे उपक्रम नेहमीच राबवने,दक्षता समिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या सदस्य या नात्याने अनेक कुटुंबांना न्याय देण्याचे काम केले,
रुग्णांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले.
वृक्ष लागवड केली असल्याची त्यांनी माहिती दिली.
तसेच समाजभूषण, शिवकन्या ,अहिल्याबाई होळकर, नारी शक्ती अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी माहिती देताना सांगितले.

