सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागात दुग्धशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा.अरविंद नाईक यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद(छ.संभाजीनगर) यांच्यातर्फे दुग्धशास्त्र विषयात पी.एचडी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा.नाईक यांनी "स्टडीज ऑन सुटबिलिटी ऑफ चक्का फोर्टिफाइड विथ कॅरोट पावडर अँड बीट पावडर इन प्रीपरेशन ऑफ व्हॅल्यु ऍडेड श्रीखंड" या विषयावर मार्गदर्शक डॉ.वसंतराव नीरस, दुग्धशास्र आणि तंत्रज्ञान विभाग, छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले.त्यांनी त्यांच्या संशोधन कार्यातून गाजर आणि बीट पावडर मिश्रित श्रीखंड तयार केल्यामुळे मुले व प्रौढ व्यक्ती मध्ये 'व्हिटॅमिन ए, बी आणि व्हिटॅमिन सी' ची कमतरता दूर होऊन मानवी जीवन मान सुधारण्यास मदत होते.
गाजर आणि बीट मध्ये उच्च प्रतीचे फायबर असल्यामुळे पचन संस्था सुधारण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.तळणीकर यांनी पी.एच.डी.संशोधन कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.तसेच सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

