श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रात्र वैऱ्याची आहे, जाग्या राहा, कायद्याचा योग्य वापर करा तरच समाज सक्षम होईल असे उद्गार श्रीरामपूर येथील राज्य महिला आयोगाच्या तसेच विद्या कलानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा विद्या क्षीरसागर यांनी तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी मंच आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात त्या "राज्य महिला आयोग आणि महिलांची सुरक्षा" या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर श्रीरामपूरच्या माजी सभापती सुरेखा क्षीरसागर उपस्थित होत्या. त्या पुढे असेही म्हणाल्या की, कुणीही अन्याय, अत्याचार सहन करू नये, कायद्यांचा गैरवापर करू नये. गुन्हे दाखल करताना योग्य ती काळजी घ्यावी. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व महामानव आपण वाचले पाहिजेत. स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका असेही त्या म्हणाल्या.
श्रीरामपूरच्या माजी सभापती सुरेखाताई शिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कराटे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रुमुख अतिथींच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कराटे प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.विनायक काळे यांनी केले तर तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून अकबर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्राचार्य डॉ .गुंफा कोकाटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.रुपाली उंडे यांनी केले. प्रा.अमृता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.स्वाती कोळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

