भोईंजे (ता. …):
भोईंजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील लहान-लहान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सुंदर भाषणे सादर केली. काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशमुख सर यांच्या हस्ते गावचे आधारस्तंभ व उपसरपंच श्री. काशिनाथ आबा उमाटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सरपंच सौ. आशा सुनील खंडागळे व गावच्या पोलीस पाटील सौ. ललिता मुसळे यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान भोईंजे गावातीलच व या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेले, सध्या भारतीय सैन्यात कार्यरत मेजर श्री. सुधीर गायकवाड व मेजर श्री. विनोद उमाटे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. दीपक डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. किसन राऊत हे होते. यावेळी बाळकृष्ण करळे (ग्रामपंचायत सदस्य), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुभाष नवले, ग्रामसेवक सौ. पौर्णिमा अडगळे, तसेच तानाजी अंधारे, श्री. अनंत सुतार, विलास नवले, माजी सरपंच सुधीर निकम, ग्रामपंचायत शिपाई अण्णा खंडागळे, मेजर राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री. हरिश्चंद्र गटकळ, श्री. दीपक डोईफोडे, चव्हाण सर, बरचे सर, श्री. सचिन देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विवेक न्यूजचे पत्रकार तसेच निर्भीड व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय महादेव गुरव यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच काही मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

