शिर्डी साई संस्थान कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: 'आश्वासित प्रगती योजना' लागू; आस्थापना प्रमुख रामदास कोकणे यांचा गौरव
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी येथील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संस्थानच्या कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षे सेवांतर्गत 'आश्वासित प्रगती योजना' लागू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण कामात प्रशासकीय पातळीवर विशेष परिश्रम घेणारे संस्थानचे आस्थापना विभाग प्रमुख श्री. रामदास कोकणे यांचा श्री साई संस्थान को-ऑप. सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
राज्याचे महसूलमंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. श्री. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच साईबाबा संस्थान तदर्थ समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना लागू करण्यासाठी श्री. कोकणे यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या कामाची दखल घेत साई संस्थान सोसायटीच्या संचालक मंडळाने त्यांचा यथोचित गौरव केला.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार (पाटील) होते, तर व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते (पाटील) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संचालक मंडळातील महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे (पा.), संभाजी शिवाजी तुरकणे (पा.), देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते (पा.), मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार (पा.), रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे (पा.), इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप (पा.), सौ. लता मधुकर बारसे (पा.), रंभाजी काशिनाथ गागरे आणि भाऊसाहेब भानुदास लबडे (पा.) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार प्रदर्शन करताना संस्थेचे सचिव विलास गोरखनाथ वाणी (पा.), सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे (पा.) आणि सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते (पा.) यांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
*🗞️ बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा!*
*📢 बातम्या | जाहिराती | विशेष लेख*
*✍🏻 पत्रकार: तुषार महाजन*
*📞 मोबाईल: 7666675370*
*⭕ “महाराष्ट्राचा” – लोकांचा आवाज, जनतेचा विश्वास!*

