शालेय गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे जिंकले मने..
वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे): देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, समर्थ ज्यूनियर काॅलेज, न्यू इंग्लिश स्कूल,विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी बँक या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सरपंच मंगल सकट,उपसरपंच नानासाहेब हराळ, सोसायटी चेअरमन रावसाहेब कोतकर,थोर समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, प्राचार्य सुनिल इंगळे, मुख्याध्यापक शिंदे मॅडम,उत्तम निकम यांच्या हस्ते शाळेमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ७. ३० वाजता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक उत्तम निकम होते. तर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून गुंडेगाव ग्रामपंचायत उपसरपंच नानासाहेब हराळ, माजी उपसरपंच संतोष भापकर,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब कोतकर,ह.भ.प.महादेव माने, संतोष धावडे, सुनिल भापकर, शिवनाथ कोतकर, जयसिंग माने,संतोष सकट, सतिश चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व या विषयी माहिती देण्यात आली तसेच शाळेचे मुख्याध्यापक उत्तम निकम यांनी शाळेसाठी दिलेल्या देणगीदार व सहकार्य केलेल्या देणगीदारांचे आभार मानत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेछा दिल्या.
त्यानंतर शालेय गुणवत्त स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेने भव्य मोठी मिरवणूक काढली होती.यामध्ये देशभक्तीपर नारे देण्यात आले.तसेच प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा पार पडला. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सर्वात शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी महिला, नागरिक, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

