शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
शिर्डी मध्ये साई वाणी या नावाने सुरू असलेल्या साई बाबांच्या जीवनावरील मोफत ग्रंथा लयामुळे साई भक्तांना सर्व भाषेत साईंचा महिमा वाचण्यात येईल या मुळे साईंचा नक्कीच जगात प्रसार होऊन शिर्डीच्या वैभवात या ग्रंथालयामुळे नक्कीच भर पडेल असे मत महाराष्टाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी या ग्रंथालया च्या भेटी प्रसंगी व्यक्त केले वातानुकूलित चोवीस तास साई भक्तांना साई महिमा सर्व भाषेत वाचण्यात यावा म्हणून या ठिकाणी मोफत सुविधा ठेवण्यात आली असून ही एक आनंदाची बाब असल्याचेही नामदार संजय शिरसाठ यावेळी म्हणाले त्यांचा साई वाणी वाचनालयाच्या वतीने सुजय खंडेल वाल व्यवस्थापक अमित खंडेलवाल यांच्या वतीने दिन दर्शिका देऊन नामदार शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लहुजी सेनेचे महाराष्ट्र सचिव रामभाऊ पिंगळे भाजपचे प्रसिद्धी प्रमुख संजय महाजन भाजप युवा मोर्चाचे नानासाहेब शिंदे आदी हजर होते.शेवटी नामदार शिरसाठ म्हणाले की हे ग्रंथालय पाहून आपणास आत्मिक समाधान लाभले असल्याचे ते म्हणाले.

