शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी येथील सम्राट विजय व्यायाम शाळेचा कुस्तीपटू ज्ञानेश्वर भोगे कांस्य पदक पटकावले आहे
सोर्टिंग पोस्ट ऑफिस येथे कार्यरत असणारे ज्ञानेश्वर दिलीप भोगे यांनी फ्री स्टाईल कुस्तीत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य प्रशासन व महाराष्ट्र राज्य प्रशासकीय जिमखाना मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. त्यात भारतीय डाक विभागाकडून खेळताना भोगे याने स्पर्धेत 57 kg फ्री स्टाईल प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले. या आधी पोस्टल सर्कल ट्रायल, सिव्हिल सर्व्हिसेस स्पोर्ट बोर्ड ट्रायल मध्ये निवड झाली होती.
महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय राष्ट्रीय स्पर्धा पैकी कुस्ती या स्पर्धेत राष्ट्रीय कुस्तीत बहुसंख्य कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला यावेळी पंच विकास पाटील, चंद्रशेखर शिंदे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुमो कुस्ती, गुंडाजी पाटील सेना केसरी. यांनी काम पाहिले.
बी. एच. नागरगोजे अधीक्षक आर एम एस एल, डिविजन भुसावळ, सुनील काकड निरीक्षक, अग्रवाल, डी. डी. पाटील, विकास पाटील, डी. एल. पाटील ए पी एम. धुळे, गुणवंत लोहार, जितेंद्र पाटील, दौलत शिंदे, राहुल सैंदाने, आर डी. खैरनार, प्रितेश पाटील, चेतन चौधरी, व आरएमएस पोस्ट ऑफीस कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
याआधी देखील त्याने खुले अधिवेशन शालेय कुस्ती स्पर्धेत व पोस्टल विभागामार्फत विविध पदकांची लयलूट केली असून ते न्याहळोद येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच दिलीप भोगे यांचे चिरंजीव असून त्यांच्या यशामुळे माजी उपसरपंच देवीदास जिरे आदींनी कौतुक केले आहे.

