श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा प्रमुख पदी विशाल रमेश शिरसाठ तर उप जिल्हा प्रमुखपदी इम्रान शेख यांची नियुक्ती करण्यात आली. नुकताच मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी वरिष्ठांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसा प्रीतम धारिया प्रमुख शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य तसेच सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिर्डी लोकसभा निरीक्षक राजेंद्र चौधरी, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,जिल्हाप्रमुख उत्तर अहिल्यानगर नितीन औताडे,संपर्कप्रमुख बाजीराव दराडे,युवासेना जिल्हा प्रमुख शुभमदादा वाघ, प्रशांतजी पाळंदे, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते विशाल रमेश शिरसाठ यांची शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख शिर्डी लोकसभा पदी तर इम्रान शेख यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे युवा नेते प्रशांतदादा लोखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी जिल्हा संघटक,दादासाहेब कोकणे बापूसाहेब शेरकर, तालुका प्रमुख प्रदीप वाघ, शहर प्रमुख,उमेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख, संदीप दातीर मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख बाबासाहेब भालेराव,तालुका संघटक, पप्पू महाराज, श्रीरामपुर बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी अमोल शिरसाठ, हारुन शहा,संतोष निकम आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या नियुक्ती बद्दल बांधकाम क्षेत्रासह सामाजिक,पत्रकारिता तथा विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111