नंदुरबार / प्रतिनिधी:
नंदुरबार येथील जनसेवा महिला संवय सहायता बचत गटातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदा जनसेवा फाउंडेशन नंदुरबार संपर्क कार्यालयात इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन च्या संस्थापिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज़ुबैदा बागवान यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदाने वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगतात सांगितले की,जसे १) किशोरी शक्ती योजना,२) इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना,३) राजीव गांधी छात्रावास योजना, ४) बेटी बचाओ बेटी पढाओ योजना,५) लाडकी बहीण योजना,६) महिला सन्मान योजना व ८) विशेष इंदिरा महिला शक्ती उत्तम प्रोत्साहन योजना या सन २०२५ महिलांसाठी ५० लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते, असे अनेक विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष जनसेवा महिला संवय सहायता बचत गटाचे रुकसाना एजाज बागवान हे होते, सचिव उजमा बागवान ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे महिला जिल्हा उपाध्यक्ष शकीला खाटीक सदस्य सायमा नाज आदी उपस्थित होते, सूत्रसंचालन रिजवाना बागवान यांनी केले तर आभार प्रदर्शन आमेरा बागवान यांनी मानले.
*वृत प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

